Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चांदसाहेब शेख यांची फेरनिवड

काटी:-तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार चांदसाहेब शेख यांची फेरनिवड करण्यात आली  असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या सकारात्मक कामाची पोहच पावती त्यांना पालक व ग्रामस्थांनी बहाल केली 

मंगळवार २० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालक मेळावा घेऊन पालकांतुन सर्वप्रथम १० पालक सदस्यांची व उर्वरित ग्रामपंचायत सदस्य , ज्येष्ठ शिक्षक , शिक्षणप्रेमी नागरिक , विद्यार्थी प्रतिनिधी , मुख्याध्यापक अशी १५ जनांची समिती नियुक्त करण्यात आली व सर्वांच्या संमतीने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळावा व गुणवत्ता वाढावी यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील असणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार चांदसाहेब शेख यांची फेरनिवड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला व उपाध्यक्षपदी दिलीप जाधव यांची निवड करण्यात आली 

चांदसाहेब शेख यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस , पालकांनी विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा करावा व शालेय साहित्य वाटावे यासाठी प्रयत्न , कामचुकार व अवेळी येणाऱ्या शिक्षकांना तंबी वजा सूचना , पोषण आहाराची पालकांसोबत वेळोवेळी तपासणी यासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यशस्वी झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आली        यापालक मेळाव्यास  उपसरपंच गिरीश डोंगरे , ग्रामपंचायत सदस्य आदमशा फकीर , आप्पासाहेब जेटीथोर , विजय गरगडे यांनी सखोल मार्गदर्शन करून ही निवड पारदर्शक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी मुख्याध्यापक डोलारे , पालक अच्युत कापसे , किरण पारधे , मुकुंद सरडे , शिक्षिका हेरकर मॅडम,येरटे मॅडम यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार चांदसाहेब शेख यांच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments