Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सभासदांचा विश्वास हाच पतसंस्थेचा आधारस्तंभ-- आमदार ज्ञानराज चौगुले श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न


मुरूम/प्रतिनिधी
जोपर्यंत पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास असतो तोपर्यंत पतसंस्थेची प्रगती कायम होत राहते. ही पतसंस्था गुणात्मक, ज्ञानात्मक व दर्जात्मक बनत असल्याचे समाधान व्यक्त केले. संस्थेची विश्वासार्हता अधिक वाढण्याकरिता पतसंस्थेच्या व्यवहारात पारदर्शकता आणणे गरजेचे असते. सभासदांचा विश्वास हाच पतसंस्थेचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. मुरूम येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३-२४ ची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २३) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, लातूरचे व्याख्याते मोहन जाधव, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, शेखर पाटील, व्यंकट पाटील, किसन खंडागळे, भीमराव वरनाळे, प्रा. डॉ. महेश मोटे, सुरेश मंगरुळे, राजेंद्र शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव आदींची उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

पुढे बोलताना आ. ज्ञानराज चौगुले यांनी संस्थेच्या वाटचालीमध्ये संचालक व सभासद यांचे विश्वासाचे नातेसंबंध असून केवळ सभासदांच्या सहकार्यामुळेच या पतसंस्थेला पुरस्काराने सन्मानित केले जात असल्याचे शेवटी ते म्हणाले. या सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना वरनाळे म्हणाले की, या पतसंस्थेला उत्कृष्ट संस्था चालविल्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून विभागीय पातळीवर सलग पाचव्या  वर्षी देखील नुकतेच पुरस्कारांने सन्मानित करण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी मोहन जाधव यांनी बँक व्यवस्थापन आणि सभासद या विषयावर मार्गदर्शन करताना पतसंस्था नियमावली व कार्यपद्धती विषयक माहिती दिली. दत्तात्रय इंगळे, योगेश गुरव, शुभम वरनाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या पतसंस्थेचे संचालक अमृत वरनाळे, श्रीशैल बिराजदार, आनंदराव बिराजदार, बाबासाहेब पाटील, शिवराज समन, गुंडेराव गुरव, पतसंस्थेचे शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, संतोष मुदकण्णा, सचिन कंटेकुरे, महांतय्या स्वामी आदींसह कर्मचारीवृंद व सभासद आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अशोक जाधव यांनी मानले. यावेळी परिसरातील विविध गावातून बहुसंख्येने सभासद नागरिक उपस्थित होते.                        

मुरूम, ता. उमरगा येथील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी ज्ञानराज चौगुले, शिवशरण वरनाळे, मोहन जाधव, दत्तात्रय इंगळे व अन्य.

Post a Comment

0 Comments