मुरूम/वार्ताहर
सर्वसामान्य व्यक्ती पेक्षाही चांगलं काम करण्याची जिद्द ज्यांच्या मनामध्ये असते अशा कर्तत्वान दिव्यांगाचा सत्कार रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ.आप्पासाहेब सूर्यवंशी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य कलया स्वामी,प्रा. डॉ. सुधीर पंचगले, रोटरी क्लबचे सचिव कल्लाप्पा पाटील हे होते.दिव्यांगता म्हणजे मर्यादा नाही; प्रत्येक दिव्यांग व्यक्तीत वेगळे कौशल्य, जिद्द आणि जगण्याची प्रेरणा दडलेली असते. त्यांच्या कमकुवतपणाकडे न पाहता त्यांच्या दिव्यशक्तीची दखल घ्यावी त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केले .तीन डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग असुन सुध्दा केसाजवळगा येथील सामाजिक काम करणारे पंडित जळकोटे, अंधत्वावर मात करून समाजापुढे आदर्श निर्माण करणारे ज्यांच्याकडे वक्तृत्वही कला आणि सामाजिक भान असणारे बेळंब येथील सहदेव बोडरे, प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथील आदर्श कर्मचारी भीमाशंकर झुरळे , श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर आणि सेवक म्हणून कार्यरत असणारे भुसणी येथील अशोक सुरवसे यांचा रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अँडवोकेट डे च्या निमित्ताने मुरूम येथील नामांकित विधीतज्ञ व रोटरी क्लब चे सदस्य अँड उदय वैद्य यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटरी क्लबचे सचिव कल्लप्पा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील राठोड यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गोविंद पाटील ,डॉ. नितीन डागा, डॉ. विजयानंद बिराजदार ,डॉ.महेश स्वामी, शिवकुमार स्वामी ,कमलाकर मोटे ,मल्लिकार्जुन बदोले , बाबासाहेब पाटील, प्रकाश रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments