धाराशिव:- देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री लातूर लोकसभा मतदारसंघाचे सात वेळा खासदार राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज पहाटे दुःखद निधन. एक स्वच्छ व अभ्यासून नेता म्हणून माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निधनाने लातूर जिल्ह्याची मोठी हानी झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै.शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील लातूर जिल्ह्यातील चाकूर या छोट्याशा गावात झाला.
त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी मिळवली आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९६७-६९ दरम्यान ते स्थानिक प्रशासनात (लातूर नगरपालिकेत सहभागी होते. केशवराव सोनवणे आणि माणिकराव सोनवणे यांनी शिवराज पाटील यांना लातूर मतदारसंघातून उभे राहण्यासाठी पहिल्यांदा संधी मिळवून दिली.
पाटील हे लिंगायत समुदायाचे होते. त्यांनी जून १९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे ते सत्य साई बाबांचे एक निष्ठावंत अनुयायी होते.
१९७२ ते १९८० पर्यंत, ते १९७२ ते १९७८ आणि १९७८ ते १९८० अशा दोन टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर शहराचे आमदार होते. या काळात त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, उपमंत्री (कायदा आणि न्यायव्यवस्था, सिंचन, प्रोटोकॉल), विधानसभेचे उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली.इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली.
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार कैलास वासी सि.ना.आलुरे गुरुजी व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी पाटील यांच्या बरोबर फार जिव्हाळ्याचे नाते होते.
एका अभ्यासू नेत्यास Only न्युज धाराशिव गृपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...
0 Comments