Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खुंटेवाडी शिवारात हिंस्त्र प्राण्याचा हल्ल्यात गाय ठार; हा हिंस्त्र प्राणी वाघ की बिबट्या याबाबत अनेकांकडून तर्कवितर्क; शेतकरी भितीच्या सावटाखाली


काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापुर तालुक्यातील खुंटेवाडी शिवारात धामणगाव येथील शेतकरी बालाजी महादेव मसाळ यांनी शेतात बांधलेल्या गाईवर हिंस्त्र प्राण्याच्या हल्यात गाय जागेवरच ठार झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी शिवारात धामणगाव येथील शेतकरी बालाजी महादेव मसाळ यांनी शुक्रवारी संध्याकाळी शेतात गोठ्याजवळ गाय बांधून घराकडे गेले होते . परंतु शनिवारी सकाळी गाईकडे गेले असता बांधलेल्या ठिकाणी गाय मृतावस्थेत आढळून आली. गाईच्या जवळच हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळून आले. त्यामुळे गाईवर बिबट्याने हल्ला केला की वाघाने याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खुंटेवाडी शिवारातील धामणगाव येथील  बालाजी महादेव मसाळ  या शेतकऱ्याच्या गोठ्याजवळील गाईवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून ठार केले. हा बिबट्या नसून वाघच असल्याचे बोलले जात आहे. गाईवर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीने
भीतीने गाळण उडाली आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

वनकर्मचारी काशिनाथ शेवाळे वनरक्षक व वनपाल घोरपडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments