तुळजापूर/उमाजी गायकवाड
दत्त भक्तांचे जागृत देवस्थान म्हणून भाविकांची ओळख असलेल्या बार्शी तालुक्यातील बार्शी-तुळजापूर रोडवरील झरेगाव येथे एकमुखी श्री सद्गुरू दत्त मठावर श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व अतिशय भक्तीमय वातावरणात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! च्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या महोत्सवात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री दत्त महाराजांची पूजा,आरती,गुरुचरित्र पारायण,पाळणा गायन या सारखे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने घेण्यात आले.
गुरुवर्य विष्णू (बाबा)कबीर महाराज पंढरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झरेगाव येथे श्री सद्गुरू मठ दत्त मंदिर येथे दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विष्णू महाराजांचे प्रवचन झाले. तसेच गुरुवर्य काका महाराज झरेगावकर यांचेही प्रवचन झाले.
गुरुवर्य काका महाराजांनी आपल्या प्रवचनातून पतीव्रता अनुसया यांचे पावित्र्य याची परीक्षा घेताना त्रिदेवांनी केलेली मागणी त्यावर अनुसयाने आपल्या पावित्र्य आणि आदित्यचा धर्म पाळून देवतांनाच बालक बनवले. ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांना अंश म्हणून अनुसया पोटी श्री दत्त जन्मले या कथेचे विवरण करून दत्त जन्माची महती उपस्थित भक्तजनांना आपल्या प्रवचनातून करून दिले.
पहाटे काकड आरती, दासबोध भजन दुपारी बारानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दत्त जन्मोत्सवावेळी महिलांसह दत्त भक्तांनी मंदीरात अलोट गर्दी केली होती. मंदीरात फुलांची आरास करत फुलांचा पाळणा बनवून दत्त जन्माचे प्रवचन आणि पाळणे गाऊन जन्मोत्सव साजरा केला.
बार्शी,तुळजापूर रोड वरती गौडगाव येथील गौडगाव येथील नागनाथ मंदीरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या झरेगाव येथील दत्त मंदिर वर्षानुवर्षे भाविकांच्या श्रद्धेचे श्रध्दास्थान बनले आहे. श्रींची पालखी मिरवणूक रात्री 9:30 वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला. या महोत्सवात बार्शी,वैराग,धाराशिव, तुळजापूर या भागातून भाविकांची गर्दी होती. श्री दत्त जयंती निमित्ताने गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
-भाविकांची गर्दी
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments