Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे सन ॲग्रो इंडस्ट्रीजच्या अत्याधुनिक गुळ कारखान्याचे भूमिपूजन

कारखान्याचे भूमिपूजन करताना उपस्थित मान्यवर....

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा उद्योजक तथा सन उद्योग समूहाचे देशमुख बंधू यांच्या सन ॲग्रो इंडस्ट्रीजच्या अत्याधुनिक गूळ कारखान्याचे भूमिपूजन शुक्रवार दि. 28 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता करण्यात आले.

एकरी उत्पादन,वाढलेला खर्च, साखर कारखान्यांकडून मिळणारा दर व हाती पडणाऱ्या रकमेचा कालावधी या सर्व बाबी पाहिल्या तर ऊसशेतीचे अर्थकारण अनेक वेळा फायदेशीर ठरत नाही. या पार्श्‍वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा उद्योजक तथा सन उद्योग समूहाच्या "सन ॲग्रो इंडस्ट्रीज"च्या माध्यमातून काटीसह परिसरातील ऊस उत्पादकांनाअत्याधुनिक गुळ कारखान्याचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

या गुळ कारखान्यातील गुळ उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार असून या कारखान्यामुळे प्रदूषणही कमी होईल आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.कारण या कारखान्यात पारंपरिक पद्धतींऐवजी आधुनिक आणि स्वयंचलित यंत्रणा वापरण्यात येणार आहे.या आधुनिक युनिटमुळे ऊसाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तसेच या कारखान्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

यंदा पाऊस चांगला झाल्याने काटीसह परिसरात उपलब्ध पाण्यामुळे ऊसक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.उसाला चांगले दर मिळण्याची शाश्‍वती झाल्याने हा गुळ कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. हा कारखाना वर्षे भरात पुर्ण होऊन पुढील वर्षी पासून पहिला चाचणी गळीत हंगाम सुरु होणार असल्याची माहिती सन उद्योग समूहाचे अमरसिंह  देशमुख यांनी दिली.

यावेळी सन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह देशमुख, नानासाहेब देशमुख, अजयसिंह देशमुख,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,माजी चेअरमन तथा  कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, प्रदीप साळुंके,सत्यजित देशमुख, सयाजीराव प्रतापराव देशमुख, माजी सरपंच अशोक जाधव, बुगय्या तेलंग,रावसाहेब देशमुख, अर्जुन बामणकर,सुरेश गाटे, अभिजित देशमुख,अमित देशमुख,बाळु चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments