काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील बुध्द विहारमध्ये बुधवार दि.26 रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुध्द विहारमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित मित्र नंदू बनसोडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्वांनी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिकरीत्या वाचन केले.
विविध धर्म,संप्रदाय,भाषा, चालीरीती असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्वांमध्ये एकात्मता टिकून असून अद्वितीय लोकशाही शासन दृढमूल केले असल्याचे दलित मित्र नंदू बनसोडे यांनी सांगितले.
भारतीय नागरिक म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकारांबाबत आपण जागरूक राहावे त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांची देखील जाणीव ठेवत कृती करावी असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे,कादर शेख, भिमराव घोंगडे,रवि डोळसे, सचिन बनसोडे, बाळासाहेब साबळे,सोजरबाई बनसोडे, उंबराबाई साबळे, पार्वती भोसले, अनुसया बनसोडे, शालेय विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी आदीजण उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं. 9923005236
0 Comments