काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी एसटी बसस्थानकावर मागील 25 वर्षांपासून सर्व विभागातील जलद, अतिजलद, रातराणी एसटी बस तामलवाडी बस स्थानकावर थांबत असताना अचानक एसटी चालक वाहक यांनी मनमानी करीत नवीन तिकीट मशीनमध्ये तामलवाडी बसस्थानक नसल्याचे कारण देत या ठिकाणी बस थांब्यावर एसटी बस थांबवत नाहीत.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना याबाबत तामलवाडी परिसरातील दहा ते बारा गावातील ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दि.22 रोजी तामलवाडी टोलनाक्यावर गाडी थांबवून एसटी बस थांब्यावण्याबाबत सुचना कराव्यात यासाठी निवेदन दिले असून या निवेदनात सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर-सोलापूर या मार्गावरील तामलवाडी हे एसटी बस स्थानक खूप गजबजलेले असून या परिसरातील दहा ते बारा गावातील अनेक प्रवासी सोलापूर,तुळजापूर,धाराशिव या ठिकाणी दररोज प्रवास करीत असतात. मागील 25 वर्षांपासून
सर्व विभागातील जलद, अतिजलद,रातराणी एसटी बस तामलवाडी बस स्थानकावर थांबत असताना अचानक एसटी चालक वाहक यांनी मनमानी करीत नवीन तिकीट मशीनमध्ये तामलवाडी बसस्थानक नसल्याचे कारण देत या ठिकाणी बस थांब्यावर एसटी बस थांबवत नाहीत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खाजगी वाहतूकही पुर्णपणे बंद असल्याने पर्यायी व्यवस्थाही होत नाही. अनेक गावांमध्ये एसटी बसची सोय नसल्याने त्यांना तामलवाडी येथूनच प्रवास करावा लागतो. तसेच तामलवाडी या ठिकाणी
शासकीय कामकाज,पोलीस स्टेशन, वैद्यकीय सुविधा,बँका, शाळा व कॉलेज, कृषी सेवा केंद्र व इतरही अनेक कामकाजासाठी तामलवाडी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सोलापूर, नांदेड,जालना, परभणी, संभाजीनगर,बीड, सातारा,कोल्हापूर,पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, धाराशिव,अहिल्यानगर या सर्व आगाराच्या जलद व रातराणी बसेस तामलवाडी एसटी बस थांब्यावर थांबवून प्रवाशी चढ-उतार करण्यासाठी संबधितांना आपण आदेशित करावे अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बसवराज मसुते,पंकज करंडे, विनायक पवार, विजय लोंढे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments