मंगरुळ/चॉंदसाहेब शेख
इस्लामच्या पाच तत्वांपैकी एक कलमा,नमाज पठण, रमजान महिन्यातील निर्जळी उपवास, जकात म्हणजे आपल्या कमाईतील अडीच टक्के दानधर्म व पाचवे सौदी अरेबियातील हज यात्रा हे मुस्लिम धर्मातील महत्वाची पाच तत्वे असून मुस्लिम धर्मीयांना पवित्र असलेल्या सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी रविवार दि.16 रोजी तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ गावातून दहा भाविक रवाना झाले. प्रत्येक मुस्लिम धर्मीयांच्या मनात आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी ही महत्त्वाकांक्षा असते आणि ही हज यात्रा अतिशय पवित्र समजली जाते. मंगरुळ येथील सुलेमान मुर्षद फकीर,मोहम्मद तांबोळी,गुलाब मकानदार,सलीम मकानदार यांच्यासह पाच महिला व पंधरा वर्षीय एका बालिकेचाही यात समावेश आहे.ते जवळपास 20 दिवस या पवित्र स्थळास भेट देऊन प्रार्थना करतील.
त्यांना हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्याकरिता सोलापूर रेल्वे स्थानकावर मुस्लिम धर्मीय युवकासह नातेवाईकांनी उपस्थिती होती.
यात्रेकरुंनी भारताच्या सुरक्षेसाठी मानव कल्याणासाठी प्रार्थना करावी
"हज उमराह यात्रेसाठी रवाना झालेल्या या भाविकांवर सोलापूर रेल्वे स्थानक येथे मुस्लीम युवकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला व मानव कल्याणासाठी, भारताच्या सुरक्षिततेसाठी, दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांसाठी,जे अविवाहित त्यांच्या लग्नासाठी पवित्र हज मक्का व मदिना शरीफ येथे प्रार्थना करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली".
त्यांना हज यात्रेसाठी शुभेच्छा देण्याकरिता शहरातील मुस्लिम धर्मीय नागरिक प्रतिष्ठित नागरिकासह नातेवाईकांची उपस्थिती होती.
0 Comments