Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीचे सुपुत्र सोमवार व मंगळवारी दिसणार सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती च्या हॉट सीट वर !

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र व सध्या धाराशिव येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध तबलावादक अनिल  ढगे यांचे सुपुत्र श्री अनिरुद्ध अनिल ढगे यांची प्रसिद्ध रिॲलिटी शो केबीसी म्हणजेच कौन बनेगा करोडपती मध्ये निवड झाली असून नुकतेच ते सहभागी असलेल्या भागाचे चित्रीकरण पार पडले आहे. 

श्री अमिताभ बच्चन यजमान असलेल्या या प्रश्नमंजुषा आधारित शो मध्ये निवड होऊन हॉट सीटवर जाण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असते. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम सुरू होऊन 25 वर्ष झाल्यामुळे हे या कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

श्री अनिरुद्ध अनिल ढगे यांनी यापूर्वी संघ लोकसेवा आयोगाची (UPSC ) 7 वेळा मुख्य परीक्षा दिली असून त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगातर्फे निवड होऊन ते वन खात्यात कार्यरत आहेत.

काटीचे सुपुत्र असलेले अनिरुद्ध  सध्या चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग 1 च्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 

ते सहभागी असलेल्या भागाचे प्रसारण सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर व मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर रात्री 9 वाजता करण्यात येणार आहे.

या यशानंतर श्री अनिरुद्ध ढगे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments