काटी: आगामी २०२५ च्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला असून काटी जिल्हा परिषद गटातून भाजपमधून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख यांचे कट्टर समर्थक सिध्दनाथ ढगे यांच्या सुविद्य पत्नी चैत्राली सिध्दनाथ ढगे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. काटी जिल्हा परिषद गटात निवडणुकीला चांगलाच वेग आला असून जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. सुरुवातीपासूनच सिध्दनाथ ढगे हे भाजपचे सक्रिय सदस्य असून गेल्या चार-पाच महिन्यापासून त्यांनी या निवडणुकीसाठी जबरदस्त तयारी केल्याचे समजते. अनेक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून व ज्योतिक्रांती परिषदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांमधून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे.
सिध्दनाथ ढगे महात्मा फुले नवरात्र उत्सव,गणेश उत्सव,
ज्योतीक्रांती परिषदेच्या माध्यमातून मोर्चे,आंदोलने विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. सध्या ते ज्योतीक्रांती परिषदेच्या शाखाध्यक्ष पदावर कार्यरत असून विविध सामाजिक कार्यात अग्रस्थानी असतात. पुर्वीपासून ते भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत.तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून ढगे यांनी मतदारांच्या घरापर्यंत संपर्क साधुन त्यांना आपलेसे केले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात आघाडी घेतली आहे. सिध्दनाथ ढगे यांनी आपल्या कार्य कौशल्यातुन जनतेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चैत्राली ढगे यांनी बोलताना सांगितले की, जनतेचा विश्वास हेच माझे खरे भांडवल आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.लोकांची कामे करण्यासाठी मी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. महिला सबलीकरण योजनांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काटी जिल्हा परिषद गटातुन चैत्राली ढगे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असुन त्याच या जागेसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितपणे या निवडणुकीत विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments