जाहिर आभार सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.. पत्रकार उमाजी गायकवाड
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी/तुळजापूर
खरतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो. माझा वाढदिवस....... आपल्या प्रेमळ शुभेच्छामुळे एक अविस्मरणीय दिवस ठरला....
13 जुन हा आजचा दिवस माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी सौभाग्याचा दिवस आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाची 58 वर्षे पूर्ण करत असताना व माझ्या दुकानदारी व्यवसायाची 28 वर्षे तर पत्रकारितेचे 17 पूर्ण करित असताना व त्या माध्यमातून आपल्या सारख्या प्रेमळ मानसांशी संपर्क आला. Only News What's Up ग्रुप, S.B. ग्रुप, तुळजापूर पुजारी नगर, तुळजापूर मोफत वधु वर सुचक केंद्र, नातीगोती सोयरिक ग्रुप, सकल मराठा सोयरिक, तुळजापूर वधु वर ग्रुप, तुळजापूर लाईव्ह यासह विविध चांगले What's Up गृपच्या माध्यमातून आपल्या सारखी जिव्हाळ्याची मानसे भेटली.व त्या माध्यमातून आपण मला भरभरुन प्रेम दिले. म्हणूनच हा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे.
प्रिय मित्र,नातेवाईक, हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने what's up,फेसबुक, वैयक्तिक भेटून, फोन करुन आपण आठवणीने स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्यात, तर पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, कार्याध्यक्ष श्रावण पवार, सचिव अनिल आगलावे, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह पुजारी नगर मधील आमचे सहयोगी सदस्यांनी माझा वाढदिवस साजरा करुन सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या शुभेच्छा पाहून मी नि:पक्षपातीपणे केलेल्या पत्रकारितेची ही पोचपावतीच आपणा सर्वांकडून मिळते आहे अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
आपण मनापासून दिलेल्या शुभेच्छामुळे मी भारावून गेलो आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. माझ्या आजवरच्या वाटचालीत आपल्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि स्नेह यांचा बहुमोल वाटा आहे. आपल्या शुभेच्छा मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत.
यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच अपेक्षा आहे.आपण सर्व सन्माननीय व्यक्तींनी, मित्रमंडळी, पत्रकार मित्र, शिक्षक मित्र,नातेवाईक, हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन आपण माझा काटी सारख्या ग्रामीण भागातील पत्रकाराचा सन्मान वाढवलात, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.आपणा सर्वाना धन्यवाद देतो.
आपला
पत्रकार
उमाजी गायकवाड
काटी/ प्रतिनिधी
दैनिक पुण्यनगरी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
0 Comments