अभिमान माने, गंजेवाडी ता. तुळजापूर
ह.मु. सोलापूर
काटी/उमाजी गायकवाड
फादर्स डे हा एक असा खास दिवस आहे ज्या दिवशी आपण आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करतो. यानिमित्ताने त्यांच्या प्रत्येक क्षणाचा आणि त्यांच्या प्रेमाचा सन्मान करतो. वडिलांचा उल्लेख आला की डोळ्यासमोर राहतं ते शात खंबीर आणि त्यागमय व्यक्तिमत्व. आईच्या माये इतकच वडिलांचे प्रेमही खोल आणि न बोलताच सर्व काही देऊन टाकणार असतं. वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली सुपर हिरो असतात जे कुठल्याही संकटात ढाल बनून उभे राहतात त्यांच्या कष्टाचं समर्पणाचं आणि आधाराचे मोल शब्दात सांगणं अशक्य आहे. आज आम्ही तिघ भावंड त्यापैकी दोघे इंजिनियर व एक डॉक्टर झालोत जे आम्ही साध्य केलंय त्यामागे त्यांच्या कष्टाचा मोठं योगदान आहे.
आमचे वडील अभिमान माने तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबातील एका शेत मजुराच्या घरात जन्मले. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने लहान पणापासून बालमजुरी करून शाळा शिकत होते. पहिली ते चौथी गंजेवाडी ते सावरगाव असे जवळपास पाच किलोमीटर अंतरावर अनवाणी पायपीट करीत सावरगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ५ ते १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी सोलापूरला गेले. परंतु एस.वाय.बीए पर्यंतचे शिक्षण चालू असताना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावरती सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी
पुण्यात जावून आर्मी जॉईन केली. माझ्या वडीलांनी वयाच्या सहाव्या वर्षी एक स्वतःला शपथ घालुन घेतली की, कष्ट, त्याग व प्रामाणीक पणाने घराची परिस्थिती सुधारण्याची व कॉलेज अर्ध्यात सोडल्यावर दुसरी शपथ घालुन घेतली की लग्न झाल्यावर होणाऱ्या मुलांना पूर्ण शिकवायचे आणि त्यामुळे ते स्वतःसाठी जगलेच नाहीत.
वडीलांचे लग्न दि. २६ मे १९८० ला झाले. सन २६ सप्टेंबर १९८५ ला ब्रम्हा दि. ०४ मार्च १९८८ ला विष्णु व दि. ०७ ऑक्टोबर १९९० ला महेश जन्माला.दि. १५ जुलै १९७६ ला वडीलांनी आर्मी जॉईन केली, तेव्हापासुन मुलांची नावे BA व MA एनिशियल येण्याच्या प्रयत्नात होते, कारण त्यांना शिकण्याची फार इच्छा होती. माझ्या वडीलांचे नावपण अभिमान आहे त्यांचे वय ६९ आहे त्यांनी आयुष्यात दारु, बिडी, सिगरेट, मावा, गुटखा, तंबाकु, चहापण नाही दोस्ती म्हैत्री हौस मौज-मस्ती सन वार, यात्रा कसलेच काही केले नाही साडे अठरा वर्षे आर्मी नोकरीत गावातले घर सुधारणा केली व सर्व लहान भावाला सोडुन दिले.
सोलापुरात आम्हाला शाळेत घातले त्यावेळी त्यांनी ९०० पगारावर वाचमनची पाच वर्षे नौकरी केली. आणि पेन्शन ९०० रुपये असे एकुण १८०० मध्ये भाडयाच्या घरात डबल टीबल ड्युट्या करून आमचे शिक्षण पूर्ण केले पहिला मुलगा ब्रम्हा बी.ई कॉम्प्युटर दुसरा मुलगा विष्णु एम.बी.बी.एस एम.डी. मेडीसीयन काडर्डीओलॉजीस्ट व तिसरा मी महेश बी.ई इलेक्ट्रीकलचे शिक्षण पूर्ण केले.
१९७७ मध्ये माझ्या वडीलांना त्यांच्या मामा पार्टीने वाळीत टाकले कारण त्यांचे जावई झाले नाहीत. १९७८ ला घरातील सर्व माझ्या वडीलांवर नाराज झाले मामाची मुलगी केली नाही व गावातील गावगुंडाच्या मुलीबरोबर लग्न जमवले म्हणून माझ्या एकुलत्या एक चुलत्याने माझ्या वडीलांचे तोंड पाहणे बंद केले मग बोलायचा तर विषय लांब राहिला. सन १९८४ मध्ये माझ्या आईला माहेरकडच्यानी वाळीत टाकले कारण आईचे वडील आईला म्हणायचे नोकरी करणारे नवरे बायकोच्या ताब्यात असतात मग तु मला पैसे का देत नाहीत माझे आई वडील एकाच गावातले आहेत.आई गाव गुंडाची मुलगी वडील गरीब घरचे १९९१ मध्ये माझ्या आई वडीलांना वाळीत टाकले आमच्या घरातल्यानी त्याचे कारण मुले शिकवालय खेड्यातून शहरात का नेताव म्हणून त्यामुळे आम्हाला कुठल्याच पाहुण्याची ओळख नाही.फक्त आजोबा व आजी महिन्याला बाजारला यायचे मिठ मिरच्यासाठी म्हणून पैसे घेऊन जायचे अशा कठीण परिस्थितीत न खचता आमचे शिक्षण पूर्ण केले त्यामुळे आम्ही फादर डे व मदर डे केव्हाच विसरु शकत नाही.
आईला व आम्हा तिघांला प्रत्येक तीन महिन्याला एक तास उभा करून समाजात कसे राहयाचे
कोणाशी दोस्ती करायची समाजात प्रगती करणाऱ्याला कसे अडकाटी करताना जवळचे व लांबचे भावा भावानी राम लक्ष्मण,भरत व शत्रुघ्नासारखे रहावे एकाला मारले तर दुसऱ्याच्या अंगावर वळ उमटावे तसेच मागील तीन महिन्यातील चुका सांगुन मारत पण होते. आम्हाला नेहमी म्हणायचे तुमची पहिली पगार येईपर्यंत असेच माझ्या पध्दतीने रहावे लागेल अन्यथा माझ्या वंशाला एक दिवा पुरेसा आहे. आमची इतकी माया करतात की, आम्ही १२-१४ वर्षाचे होईपर्यंत आम्हाला अंघोळ वडीलांनी घातली.
आमचे आई वडील इतके प्रेमाने व एक जीवाने राहत होते की, त्यांच्यात भांडण किंवा रुसवेफुगवे आम्ही केव्हाच पाहिले नाही. आम्हाला हॉटेलात वर्षाला एकवेळ नेत व मालक नोकराला कसे शिव्या देतो ते दाखवायचे दारु पिलेला पाहुणा आला तर त्याला घराचा उंबरठा कधीच चढु दिला नाही. आम्हास सकाळी ५ नंतर केव्हाच झोपु दिले नाही १२वी पर्यंत आमच्या दोस्ताचे इंटरव्हिव घ्यायचे. आमच्या घरा समोर आम्हाला खेळू दिले नाही.आपल्या हॉलमध्ये खेळा म्हणायचे दोस्ती, नोकरी कराल तेथे करा शिकताना नाही माझ्या वडीलांचा स्वभाव फार कडकशिस्ताचा आहे आणि मायाळु पण तेवढेच आहेत. मध्यंतरी आमच्या आईचे दु:खद निधन झाले. परंतु अशा कठीण परिस्थितीतही वडिलांनी आईची कसलीही उणीव भासू दिली नाही.
माझ्या वडीलांनी २०११ पासुन पेन्शनमधुन शिल्लक पैसे नडलेल्या लोकांना उसने १८,००,०००/-रुपये मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, दवाखान्याचे बिल तसेच इतर कामा करीता दिले आहेत. परंतु त्यांना पैसे परत देण्यासाठी कधीही तगादा लावला नाही. व पैसे घेणाऱ्यांनीही पैसे येईल तसे परत दिले.
आपले आज्ञाधारक मुले
लेखक:-महेश अभिमान माने,
ब्रम्हदेव अभिमान माने
डॉ.विष्णू अभिमान माने
गंजेवाडी ता.तुळजापूर
व्हॉटसप नंबर ९०७५३४५३३२
0 Comments