Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नवीन उमेद, स्वप्न साकारण्यासाठी प्रवेशोत्सव


मुरुम/प्रतिनीधी
जि.प. स्पेशल प्रा.शाळा मुरूम येथे प्रवेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मलकुमार लिमये यांच्या ट्रॅक्टर मधून भीमनगर, साठेनगर, महादेव नगर, पोस्ट कार्यालय, नगरपरिषद, नेहरू नगर मार्गे मिरवणूक काढण्यात आली. अध्यक्षांनी स्वतः ट्रॅक्टरची सजावट करुन त्यांचे सारथ्य केले. उपाध्यक्ष शिवराज कांबळे यांच्याकडुन गोड शिरा वाटप करण्यात आले. 

यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल शाळेत उपक्रम घेण्यात आला. त्यांना पुस्तके, फुगे, चाॅकलेट,  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने सदस्य सतीश भालेराव, अरविंद कांबळे, मनिषा भालेराव, जयपाल सुरवसे, लखन देडे, मोतीराम गायकवाड, आकाश कांबळे, अभिषेक कांबळे आदी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे सहशिक्षक रुपचंद ख्याडे, शिवाजी गायकवाड, सुनिता मिरगाळे, मंगल कचले अमर कांबळे यांनी केले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या संदेशाचे वाचन रुपचंद ख्याडे यांनी केले. संदेश वाचन करून मान्यवरांचे विविध शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. राजेश गायकवाड यांनी प्रवेश उत्सवाचे सुंदर फलक लेखन केले.तसेच शाळेतील परिसराची स्वच्छता सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी धम्मचारी, निर्मलकुमार लिमये यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्वांचे योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments