Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुका समाजवादी पार्टी व देवराज मित्र मंडळातील कार्यकर्त्यांची आज बैठक

तुळजापूर/उमाजी गायकवाड  
तुळजापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे नेते देवानंद (भाऊ) रोचकरी यांचा 20 जुन रोजी समाजोपयोगी कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 20 जुन रोजी तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्र मंडळ व समाजवादी पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भव्य "कार्यकर्ता मेळावा" संपन्न होणार आहे.

"भव्य कार्यकर्ता मेळावा"  च्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्र मंडळ व समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आज बुधवार दि.11 रोजी सकाळी 11 वाजता येथील जुन्या बसस्थानक समोरील देवराज मित्र मंडळ कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत समाजवादी पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यक्रमांचा आढावा, शुभेच्छापर बॅनर लावणे, तसेच आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.

या बैठकीस मेळाव्यास तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील देवराज मित्र मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी,ॲड.उदय भोसले, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments