तुळजापूर/उमाजी गायकवाड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर जाण्याचा योग तुळजापूर येथील पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, मार्गदर्शक सतिश खोपडे सर व पुजारी नगर मधील सर्व सहकारी मित्र यांच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात प्रथमच आला.
आतापर्यंत मी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी मी फक्त एकले होते.परंतु माझ्या राजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा लाखों मावळ्यांच्या उपस्थितीत त्या मावळ्यांचा अभूतपूर्व उत्साह, जल्लोष पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. आमच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज रयते राज्य येण्यासाठी अवघड व उंच डोंगर रांगेत किल्ले कसे बांधले असतील याबाबत कल्पनाच करवत नाही.
यंदा प्रथमच अभूतपूर्व उत्साहात आणि ऐतिहासिक गर्दीत देशभरातून लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत गडावर येऊन ‘याची देही याची डोळा’ हा सोहळा अनुभवला.
तुळजापूरला श्री शिरकाई देवीस मानाची साडी,चोळी, कवड्याची माळ, कुंकू देण्याचा मान
रायगडावरील "श्री शिरकाई देवीस" मानाची साडी, चोळी, कवड्याची माळ व महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मातेच्या चरणस्पर्शी असलेले कुंकू देण्याचा मान तुळजापूरांना मिळाला. हे सर्व साहित्य पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी,मार्गदर्शक सतिश खोपडे सर व सर्व सहयोगी सदस्य यांच्या मार्फत शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मुख्य संयोजक संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिरकाई देवीस अर्पण करण्यात आले. त्यानिमित्त संभाजीराजे छत्रपती व त्यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे यांना जवळून पाहण्याचा योग आला.
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर गेल्यामुळे गडावरील पावसाळी आल्हाददायक वातावरणात ढोल-ताशा,नगारे,पारंपरिक वेशभूषा, कोकणातील खालुबाजा व शासनकाठी यांच्या जल्लोषात शिवकाळ पुन्हा अवतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गडावर जाण्यासाठी असलेल्या रोप वे चा वापर तर आमच्यासाठी तर निराळाच अनुभव होता. डोंगर रांगा, तेथील निसर्ग रम्य वातावरण,रायगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत असल्यामुळे रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी सह्याद्री पर्वत डोंगर रांगेतील भितीदायक आंबेनाली घाट,वरंधा घाट,सरपनी घाट, प्रताप गडाकडे जाणारा आंबेनळी घाट हे घाट पाहण्यात आले. अनेक निसर्ग रम्य ठिकाणी फोटो सेशन झाले.
मराठा आरक्षण प्रवक्ते तथा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या समवेत...
डोंगर रांगेतून ओशाळणाऱ्या पाण्याच्या धबधब्याखाली व महाबळेश्वर जवळील नदीवर केलेल्या अंघोळीचा आम्ही सर्वांनी घेतलेला अनुभव फारच अविस्मरणीय होता. परतीच्या प्रवासात महाडचे चवदार तळे अशा विविध पर्यटन स्थळांना व निसर्ग रम्य ठिकाणांना भेटी देत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुखद प्रवास करुन सुखरूप परत आलो.
युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर
शिवराज्याभिषेक गीताने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर विविध नद्यांच्या पवित्र जलाने छत्रपती संभाजीराजे व युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते
छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस विधिवत अभिषेक करण्यात आला. या सोहळ्याला मराठा आरक्षण लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपस्थिती लावून त्यांनी छत्रपतींच्या आशीर्वाद घेत पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजापूरहुन पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी,मार्गदर्शक सतिश खोपडे, उपाध्यक्ष उमाजी गायकवाड, कार्याध्यक्ष श्रावण पवार, सचिव अनिल आगलावे, सिध्देश्वर इंगोले, शितल अमृतराव,राहुल जाधव, कैलास जमादार , महावितरणचे शिवशंकर म्हमाणे,शशिकांत रोडे, राज कदम सहभागी झाले होते.
0 Comments