येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे बुधवार दि. 21 रोजी येथील हनुमान चौकात सरपंच रेखाताई गुंजोटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सतीश पाटील यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड व सहसचिवपदी युनूस देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर ग्रामपंचायतच्या वतीने नुतन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड व सहसचिव युनूस देशमुख यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच रेखाताई गुंजोटे,माजी उपसरपंच तथा ग्राम.पं.सदस्य विजयानंद सोनकटाळे, ग्राम.पं.सदस्य बाबासाहेब गायकवाड,संदीप बिराजदार, राहुल बनसोडे, संतोष कलशेट्टी,प्रवीण कागे,महेश बिराजदार,सचिन गुंजोटे,कुमार सुरवसे, संतोष बिराजदार,अप्पू हिप्परगे, संजय दूधभाते, नितीन हिप्परगे,अक्रम माळवाले आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments