Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बाबासाहेब गायकवाड यांची येणेगूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड

येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मावळते उपसरपंच विजयानंद सोनकटाळे यांचा दीड वर्षाचा कालावधी संपल्यानंतर आपल्या पॅनल प्रमुखांच्या शब्दाला मान ठेवून उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. व त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या जागी येणेगूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाबासाहेब गायकवाड यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायकवाड हे  एक दगडात दोन घाव करणारे दलित पॅंथरचे झुंजार नेते म्हणून उमरगा तालुक्यासह पंचक्रोशीत त्यांची ओळख आहे. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल विविध कार्यालय व संघटनेच्या ग्रामपंचायत च्या विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ,व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी उपसरपंच तथा ग्राम.पं.सदस्य विजयानंद सोनकटाळे, ग्राम.पं.सदस्य दिलीप येडगे,ग्राम.पं.सदस्य संदीप बिराजदार, ग्राम.पं.सदस्य राहुल बनसोडे,ग्राम.पं.सदस्य प्रवीण कागे, सरपंचपती विश्वनाथ गुंजोटे, संतोष मुदकण्णा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments