Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

समाजवादी पार्टीच्या वतीने काश्मीर पहलगाम येथील अतिरेकी भ्याड हल्याचा जाहीर निषेध; अतिरेक्यांवर‌ कडक कारवाई करावी तहसीलदार माया माने मार्फत पंतप्रधानांना निवेदन

तुळजापूर:-समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी यांनी गुरूवार दि.24 एप्रिल रोजी तहसीलदार माया माने मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील अतिरेकी भ्याड हल्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात जम्मू-काश्मीर मधील  पहलगाम येथील अतिरेकी भ्याड हल्ल्याचा निषेध करुन या भ्याड हल्याला केंद्र शासनाने जशास तसे उत्तर देऊन अतिरेक्यांचा खात्मा करावा व पुढे असे दहशतवादी अतिरेकी हल्ले होऊ नये या करीत कडक पावले उचलावीत तसेच पाकिस्तान सोबतचे आर्थिक संबंध, व्यापार बंद करुन अतिरेकी अड्यांवर कार्यवाही करावी. जम्मू काश्मीर मधुन संपुर्णपणे अतिरेक्यांचा खात्मा करावा व पर्यटनसाठी भयमुक्त वातावरण करावे.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी, समाजवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, महावीर मुळे, राम पवार,राहुल कदम, अनुष्क कोरडे, प्रमोद डोंगरे,आबा माने, सुहास पठाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments