बार्शी/प्रतिनिधी
माहिती अधिकार कायदा हा नागरिकांच्या पारदर्शकतेसाठी असून नागरिकांना हवी ती माहिती वेळेत आणि लगेच द्यावी याच्यासाठी हा कायदा आला आहे. या कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाला त्याची माहिती लगेच मिळाली पाहिजे त्यासाठी आपण कर्मचारी म्हणून प्रयत्न करावा असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी तथा यशदा पुणे येथील राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी बोलताना केले.
ते बार्शी तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तलाठी मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्याकरिता एकदिवसीय माहिती अधिकार कायदा या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नायब तहसीलदार संजीवन मुंडे नायब तहसीलदार सानप साहेब आणि नायब तहसीलदार बदे साहेब यांच्या शुभहस्ते शिवाजीराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार एफ आर शेख हे होते.
पवार बोलताना पुढे म्हणाले की,भारतीय स्वातंत्र्यानंतर नागरिकांना आत्मसन्मान देणारा आणि शासकीय कार्यालयातील कोणतीही माहिती कोणत्याही नागरिकाला मिळण्यासाठी आणि राज्यकारभारात पारदर्शकतेसाठी हा कायदा आला.त्यामुळे नागरिकांनी याचा गैरवापर न करता तो योग्य पद्धतीने वापरून आपले कार्यालयीन काम करून घ्यावे आणि हवी ती माहिती मिळवण्यासाठी हा कायदा आला आहे. या कायद्याला कालमर्यादेचे बंधन असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. या कायद्यातील 01ते 31 कलम अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांना सांगण्यात आले कायद्यातील बारकावे तरतुदी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील काही केस लॉ आणि केस स्टडी यांचीही माहिती यावेळी देण्यात आली .
आपल्या कार्यालयात नागरिकांचे जास्तीत जास्त माहिती देऊन अर्ज निकाली काढावे आणि लोकांना माहिती लगेच कसे मिळेल याची व्यवस्था करावी अशीही यावेळी सांगण्यात आले . यावेळी संपूर्ण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मंडलाधिकारी कोतवाल आणि गाव सज्जातील तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे शेवटी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून यामुळे आम्हाला अनेक गोष्टी कळाल्या असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसीलदार पदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार सानप यांनी केले.
0 Comments