Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरूळ बीटस्तरीय साविञी जोतिबा फुले शिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न


काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर  तालुक्यातील मंगरुळ बीट अंतर्गत बीटस्तरीय विशेष उपक्रम निधीतून घेतल्या जाणा-या मंगरुळ बीटस्तरीय शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा विविध  मान्यवरांच्या उपस्थितीत यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात गुरुवार  दि.17 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या  अध्यक्षस्थानी अशोक पाटील शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) जिल्हा परिषद, धाराशिव, होते तर व्यासपीठावर प्रमुख वक्ते 
 प्रा. डॉ. महेश्वर कळलावे सहाय्यक प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिव,प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी 
अमोल ताकभाते, डायटच्या जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.अंजली सुर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव,
रुपमाता अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या सौ.महानंदा माने,मंगरुळ बीटचे विस्ताराधिकारी श्री.मल्हार माने, शिक्षक संघटनेचे  नेते लालासाहेब मगर,नांदुरी केंद्र प्रमुख संजय वाले,येवती केंद्र प्रमुख अनंत हाके होते.

बीट मधील 31 पुरस्कारप्राप्त  शिक्षकांचा शाल व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

लोकसहभागातून बिट स्तरावर दरवर्षी विद्यार्थी विकासाचे विविध उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे बिट मधील शिक्षकांना काम करण्यास प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या विचारातून बिट स्तरीय साविञी -जोतिबा फुले शिक्षक पुरस्कार या बीट अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. 

या कार्यक्रमात विस्तार अधिकारी मल्हार माने यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

विस्तार अधिकारी मल्हार माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना उपस्थित मान्यवर...

या पुरस्कार वितरण सोहळ्यात बीट स्तरीय सावित्री जोतिबा फुले पुरस्कार प्राप्त शिक्षक 
इर्शाद पापामियाँ शेख जि .प.प्रा.शाळा कुंभारी, शिवानंद गौरीशंकर साखरे - जि.प.प्रशाला आरळी (बु.),रमेश श्रीपती शिंदे जि. प. प्रशाला काटगाव, मोहन विश्वनाथ राजगुरू - जि.प.प्रा. शा.चिवरी
 श्रीमती. विद्या हरिदास भोसले-जि.प.प्रशाला नांदुरी,शहाजी माणिकराव शिंदे-दत्तू पाटील (आण्णा) माध्य. विद्यालय चिवरी, खंडू देविदास माळी - जि. प. प्रा. शा.कसई,प्रमोद अरविंद चौधरी - जि.प.प्रा.शा. बसवंतवाडी,श्रीमती सपना हरिभाऊ जाधव - जि. प. प्रशाला काटगाव, हनुमान मरगा गायकवाड जि. प. प्रा. शा. आरळी (बु.) दिलीप माणिकराव अंधारे-जि. प.प्रा. शा. कोरेवाडी, श्रीमती कल्पना सुभाष घुगे - जि. प. माध्य.विद्यालय येवती, बंडू पांडुरंग डोंबाळे - इंदिरा माध्यमाध्यम माध्य. वि. मंगरूळ, काकासाहेब विश्वनाथ सूर्यवंशी-जि.प.प्रा.शा. बसवंतवाडी, श्रीमती लक्ष्मी बापूराव सरडे - प्रशाला मंगरुळ,श्रीमती स्वाती तुकाराम सुने - जि.प.प्रा.शा.दिंडेगाव, सौ.अंजली अशोक राव कासार जि.प.प्राथमिक शाळा काटगाव, गणेश मतिवंत क्षीरसागर - जि. प. कें.. प्रा. शा. येवती, आण्णासाहेब रोहिदास कोल्हटकर-एकलव्य माध्य. आश्रम शाळा यमगरवाडी, श्रीमती दिपाली लिंबराज सोमवंशी - जि. प. प्रा. शा. चिंचोली, विनायक महादेव माने - श्री राम माध्य. वि. धोत्री, संदिप नारायण लोखंडे जि.प.प्राथमिक शाळा महाळाप्पा वस्ती, श्रीमती सुरेखा रमेश भुतेकर-जि.प.प्रा.शा.कदमवाडी (मा.), शरद बब्रुवान सोनटक्के) -जि. प. प्रा.शा. चिवरी,श्रीमती दिपाली बाबुराव होष्टे - जि. प. प्रा. शा. धोत्री,विकास मुरलीधर माळी - जि. प. प्रा. शा. इंदिरानगर,श्रीमती सारिका विश्वनाथ कदम - जि.प. प्रा. शा. काटगाव श्री. स्वप्निल सुभाष माशाळकर. जि.प.प्रा. शाळा अरळी (बु.), श्रीमती सुवर्णा अजय शिवकर - जि.प. कन्या प्रा.शा. मंगरूळ, अशोक सुधाकर बनकर - एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा यमगरवाडी,श्रीमती घोडके छाया शंकर -संत गाडगेबाबा प्राथमिक. आश्रमशाळा, मंगरूळ यांना सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात सुत्रसंचलन सहशिक्षका सुरेखा भुतेकर तर आभार केंद्र प्रमुख संजय वाले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments