Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अनेकांचे गावचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगलं! तुळजापूर तालुक्यात 108 गावापैकी 50 गावात महिलाराज; असे आहे आरक्षण

काटी/उमाजी गायकवाड 
आपल्या गावात आपलेच आरक्षण पडावे ,यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. अखेर अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले तर अनेकांचे स्वप्न भंगले आहे. गावचा पुढारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेकांनी सरपंच पदाची तयारी केली होती. बुधवारी तुळजापूर तालुक्यातील 108 ग्रामपंचायतील  आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे स्वप्न भंगले आहे. तर अनेकांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत पार पडल्यानंतर 'कही खुशी कही गम' असे तुळजापूर तालुक्यातील चित्र होते. बुधवारी दुपारी सरपंचपदाची सोडत पार पडली.

तुळजापूर  तालुक्यातील 108  ग्रामपंचायतीपैकी 50 ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. दरम्यान आरक्षण सोडतीच्या दरम्यान ग्रामीण भागातील पुढाऱ्यांनी तालुकास्तरावर सोडतीच्या ठिकाणी गर्दी केली होती. बुधवारी सोडत असल्याने सोडती संदर्भात एकमेकांना फोनद्वारे आमच्या गावाचे आरक्षण काय आहे अशी विचारणा करीत होते.

तुळजापूर तालुक्यातील 108  ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदासाठी आज तालुकास्तरावर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही प्रक्रिया संपली.

सोडतीकडे सरपंच होऊ पाहणाऱ्या पुढाऱ्यांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. शिवाय सरपंच पदासाठी इच्छुकांची घालमेल देखील दिवसभर पाहायला मिळाली. गावागावातील राजकीय गटांमध्ये सरपंच पदा संदर्भात चर्चा रंगली होती.


Post a Comment

0 Comments