Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडी येथे ग्रामदैवत समाधिस्थ योगी बोधगिरी महाराज संजिवनी समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन


काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे ग्रामदैवत समाधिस्थ श्री.बोधगिरी महाराज संजिवनी सोहळ्या निमित्त शनिवार दि.19 एप्रिल ते शनिवार दि.26 एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह सोहळ्यात विविध नामांकित किर्तनकारांचे किर्तने होणार आहेत. 

या सप्ताह सोहळ्यात दररोज सकाळी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,हरिनाम,दररोज दुपारी 2 ते 5 नामवंत प्रवचनकारांचे प्रवचने, हरिपाठ, हरिजागर तसेच दररोज सायंकाळी 9 ते 11 नामवंत किर्तनकारांचे किर्तन होणार आहेत.

या किर्तनकारांमध्ये  प्रामुख्याने शनिवार दि. 19 रोजी ह.भ.प. अर्जुन मोटे महाराज, आळंदी देवाची, रविवार दि.20 ह.भ.प.डॉ श्रीगुरु जयवंत महाराज बोधले महाराज, पंढरपूर, सोमवार दि.21रोजी हभप धर्मभूषण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव, मंगळवार दि.22 रोजी हभप महंत अमृतराव जोशी महाराज, राजुरी बीड,बुधवार दि.23 रोजी हभप गायनाचार्य कविराज झावरे महाराज,अहिल्यानगर, गुरुवार दि.24 रोजी हभप विनोदाचार्य प्रकाश साठे महाराज,बीड, शुक्रवार दि. 25 रोजी हभप श्री गुरू कान्होबा महाराज, देहू संत तुकाराम महाराज वशंज देहूकर, तर शनिवार दि. 26 रोजी सकाळी 8 वाजता गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक निघणार असून दुपारी 12 वाजता  हभप गुरुवर्य प्रभाकर (दादा) बोधले महाराज, पंढरपूर यांचे काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.

हभप प्रभाकर (दादा) बोधले महाराज पंढरपूर

या सप्ताह सोहळ्याचा केमवाडीसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन केमवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments