तुळजापूर/उमाजी गायकवाड
सध्या भीषण उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. तर एकीकडे अनेक झाडे कडक उन्हामुळे शेवटची घटका मोजत असताना तुळजापूर शहरातील पुजारी नगरमधील ग्रामसेवक प्रभाकर नलावडे यांच्या घरासमोरील गुलमोहरचे झाड लाल फुलांनी बहरल्याने या निसर्गाच्या चमत्कारामुळे कडक उन्हात स्वर्गसुखाचा व नेत्रसुखाचा आनंद मिळत आहे.
भीषण उन्हाळ्यात एकीकडे अनेक झाडे उन्हामुळे शेवटची घटका मोजत असताना ग्रामसेवक नलावडे यांच्या घरासमोरील निसर्गाची किमया असल्यासारखे व स्वर्गसुखाचा आनंद देणाऱ्या गुलमोहराला अगदी आग लागल्यासारखी लाल फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
गुलमोहर हा वर्षातून केवळ एकदाच तोसुद्धा उन्हाळ्यातच फुलतो. सहज उगवणाऱ्या या वृक्षाची पाने अगदी चिंचेच्या वृक्षासारखी बारीक असून उन्हाळ्यात इतर वृक्षांची पाने गळतीच्या मार्गावर असताना लाल फुलांनी हा वृक्ष बहरल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
0 Comments