काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे सोमवार दि. 14 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट, नवीन पनवेल, युनिटचे अध्यक्ष सावरगावचे सुपुत्र रघुनाथ डोलारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, डॉ.वैष्णवी जाधव, डॉ.नागरगोजे यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळा व मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
या आरोग्य शिबिरात जवळपास 200 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच पांडुरंग हागरे, सावरगावचे सुपुत्र सोलापूर ट्रॅफिकचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी साळुंके, ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ डोलारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घघाटन करण्यात आले.
आरोग्य शिबिराचे उद्घघाटन करताना भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ डोलारे,माजी सरपंच पांडुरंग हागरे, रमेश काढगावकर, हरि कदम आदी मान्यवर....
छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, आयोजक नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ डोलारे, माजी सरपंच पांडुरंग हागरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल , पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रातील या मान्यवरांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात प्रामुख्याने सावरगावचे सुपुत्र सोलापूर ट्रॅफिकचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी साळुंके, तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल व्ही.सी. सरंगुले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. वैष्णवी जाधव, डॉ.नागरगोजे,पत्रिकारिता क्षेत्रातील पत्रकार उमाजी गायकवाड, आरोग्य कर्मचारी संतोष विभूते, शिक्षण क्षेत्रातील सहशिक्षक बापू काळे, सामाजिक क्षेत्रातील रोहित पाटील, रमेश काढगावकर, हरि कदम,अतुल पवार, बचत गटाच्या सिमाताई जोशी यांच्यासह त्यांच्या सहकारी, अंगणवाडी सेविका कागल फडके,ललिता भालेकर यांच्यासह त्यांच्या सहकारी तसेच सावरगावसह काटी, तामलवाडी, केमवाडी, सुरतगाव, गंजेवाडी, गवळेवाडी,सांगवी (काटी) आदी गावातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील माजी सरपंच पांडुरंग हागरे,नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ चोखा डोलारे,पोलीस उपनिरीक्षक बालाजी साळुंके, रोहित पाटील,अतुल पवार हरी कदम,रमेश काढगावकर, तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल व्ही.सी. सरंगुले,सागर डोलारे,ट्रस्टचे खजिनदार भीमराव डोलारे, सल्लागार कमिटीचे विकास डोलारे, सोमनाथ फडके,चंद्रकांत फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ चोखा डोलारे, ट्रस्टचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments