तुळजापूर:- तुळजापूर शहरातील आकाश कदम यांच्या यश डेअरीच्या शॉपीचे शानदार उद्घाटन समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आकाश कदम यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
तुळजापूर शहरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या यश डेअरी फार्ममध्ये ग्राहकांसाठी म्हशीचे दुध,गाईचे दुध,मलई दही,साधा दही,मलई पनीर, चक्का, लोणी, किम,तुप,श्रीखंड,आम्रखंड, चासुंदी,खवा,स्पेशल पेढा, कुंदा, बर्फी,लस्सी, मठ्ठा,अंजीर रबडी, सिताफळ रबडी,सुगंधी दुध असे दुग्धजन्य पदार्थ योग्य भावात मिळणार आहेत. तसेच यश डेअरी फार्मच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचे ऑर्डर स्वीकारले जाणार असल्याची माहिती यश डेअरीचे सर्वेसर्वा आकाश कदम यांनी दिली.
या उद्घाटनप्रसंगी समाजवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा (भैय्या) रोचकरी ॲड. उदय भोसले, आकाश कदम, महावीर मुळे, धनू पाटील, सुहास पठाडे आदी मान्यवरांसह कदमवाडी गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments