Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

संक्रांतीचा उत्साह: तुळजापूरात नारळी-पुष्पाच्या सुगंधात आणि स्नेहाच्या वातावरणात हळदीकुंकू सोहळा संपन्न; उपनगराध्यक्ष रोचकरी कुटुंबियांकडून महिलांना वाण भेट; प्रभाग 11 मध्ये महिलांची मांदियाळी; उपनगराध्यक्ष रोचकरी यांच्या पत्नी रोहीणी रोचकरी यांच्या पुढाकाराने रंगला संक्रांत उत्सव

​तुळजापूर/उमाजी गायकवाड 
मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 11 चे कार्यक्षम नगरसेविक तथा उपनगराध्यक्ष यांच्या पत्नी सौ. रोहिणी रोचकरी त्यांचे बंधू निलेश रोचकरी यांच्या पत्नी पुनम निलेश रोचकरी वतीने  गुरुवार दि. 15 रोजी सायंकाळी भव्य 'हळदीकुंकू' आणि वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रभाग अकरा व शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी यांच्या निवासस्थानी ​आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सर्व महिला पारंपारिक वेशभूषेत हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन 'तिळगुळ घ्या, गोड बोला' म्हणत एकमेकींना शुभेच्छा दिल्या.उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी यांच्या पत्नी सौ.रोहीणी रोचकरी,पुनम निलेश रोचकरी, नगरसेविका अश्विनी विशाल रोचकरी आदी मान्यवर महिलांच्या हस्ते उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून आकर्षक वाण वाटप करण्यात आले.

​एकतेचा संदेश....
​यावेळी बोलताना  सौ. रोहिणी रोचकरी म्हणाल्या की, "हळदीकुंकू हा केवळ एक धार्मिक विधी नसून महिलांना एकत्र येण्याचे, विचारांची देवाणघेवाण करण्याचे आणि सामाजिक ऋणानुबंध जपण्याचे एक उत्तम माध्यम आहे. प्रभागातील सर्व भगिनींना एकत्र पाहून मनाला आनंद झाला."

​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका 
अश्विनी विशाल रोचकरी,प्रज्ञा सुधीर रोचकरी,प्रिया मनोज मलकुनाईक,नम्रता अमर हंगरगेकर,पुजा विकास रोचकरी, सारिका शाम लोंढे पाटील उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे नियोजन उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी व त्यांचे बंधू निलेश रोचकरी यांनी अतिशय नेटकेपणाने केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

​या उपक्रमामुळे प्रभागातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून, उपनगराध्यक्ष रोचकरी व त्यांच्या पत्नी सौ.रोहीणी रोचकरी,पुनम निलेश रोचकरी यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments