Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ढोकी येथे मकर संक्रात निमित्त ऊसतोड महिला मजुरांना तेल बॉटलसहअल्पोहार वाटप; हळदी,कुंकू कार्यक्रमास ऊसतोड महिलांचा मोठा प्रतिसाद

ढोकी/प्रतिनिधी
मकर संक्रात निमित्त व वाढदिवसाचे औचित्य साधून ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड महिला मजुरांना तेल बॉटल व अल्पहार देऊन हळदीकुंकवाचा कार्यक्रम  गुरुवार दि. 15 रोजी सायंकाळी 8.00 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास ऊसतोड महिला मजुरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

ऊन वारा थंडी नजुमंता शेकडो किलोमीटर गाव सोडून आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी राज्यातील ऊस कारखान्यावर ऊसतोड महिला मजूर काम करून आपली उपजीविका भागवत असतात या ऊसतोड महिला सणापासून वंचित राहू नये म्हणून मकर संक्रात निमित्त ढोकी येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सुरेश कदम यांची कन्या सानिका हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गटातील कोपीवर जाऊन ऊसतोड महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन त्यांना थंडीची सुरक्षा म्हणून  प्रत्येक महिलाला एक तेल बॉटल अल्पोहार तसेच तिळगुळ देऊन हळदीकुंकू लावून मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

त्यानंतर उपस्थित महिलांना आरोग्य विषयक सविस्तर मार्गदर्शन आरोग्य केंद्राच्या अशा सुपरवायझर रेखाताई गुंजकर कदम यांनी मार्गदर्शन केले काही आरोग्य विषयक अडचणी आल्या तर ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी सुंदर उखाणे घेत या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमास पत्रकार सुरेश कदम, कारखान्याचे सुरक्षा अधिकारी सुनील लंगडे, पोलीस पाटील राहुल वाकुरे, सार्थक कदम, सानिका कदम,अशा स्वयंसेविका अशा स्वयंसेविका आशा कदम , गुलचंद लंगडे, ओम कदम, प्रणव लंगडे, ऊसतोड मुकदम विनायक चौरे यांच्यासह ऊसतोड महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments