Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​"जनसेवेचा वसा, विकासाचा ध्यास व लोकसेवेची तळमळ असणारे शिवसेना उबाठा पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ते युवा उद्योजक विनय (भाऊ) शेळके यांची महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेना (उबाठा) पक्षाकडून बेंबळी जिल्हा परिषद गटातून इच्छुक म्हणून प्रबळ दावेदारी; शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण; उमेदवारीसाठी बेंबळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (उबाठा) पक्ष श्रेष्ठींकडे मागणी

धाराशिव:-नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकी पाठोपाठ  जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी अनेक नवीन आणि अनुभवी इच्छुक उमेदवारांनी  मोर्चेबांधणी सुरू केली असून आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.

महा विकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथील शिवसेना (उबाठा) पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते युवा उद्योजक विनय (भाऊ) शेळके  यांनी बेंबळी जिल्हा परिषद गट मतदारसंघातून इच्छुक म्हणून आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे. निष्ठावान शिवसैनिक आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघात मोठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने बेंबळी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

​पक्षाशी एकनिष्ठ आणि जनसेवेचा वारसा पक्षाच्या पडत्या काळातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास (दादा) पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन उद्योजक विनय (भाऊ) शेळके यांनी बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय असून 2021 मध्ये विनय (भाऊ) शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंबेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव करीत आंबेवाडी ग्रामपंचायतवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा फडकला होता.

विनय भाऊ शेळके यांनी स्वखर्चाने आंबेवाडी गावात अनेक समाजोपयोगी कामे केली असून त्यांची दिलदार नेतृत्व म्हणूनही परिसरात ओळख आहे. तसेच त्यांनी गावात दारुबंदी सारखे धाडसी निर्णय घेतले आहेत. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे.

त्यांच्या या कार्यामुळे बेंबळी जिल्हा परिषद गटातून विनय (भाऊ) शेळके यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिक व मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे. "सामान्य माणसाच्या सुख-दु:खात धावून जाणारा हक्काचा माणूस" अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, त्यांना उमेदवारी मिळाल्यास या गटात भगवा फडकणारच, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 

​विकासाचा नवा अजेंडा याबाबत बोलताना विनय (भाऊ) शेळके म्हणाले की, "पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहुन व लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 'मशाल' घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा,महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेळके यांनी बेंबळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याबाबत शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली असून सध्या बेंबळी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदार व नातेवाईक यांना भेटण्यावर भर दिला असून त्यांचे मामा माजी सरपंच नवनाथ क्षिरसागर यांच्या पत्नी दैवताला क्षिरसागर पुर्वी याच मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यामुळे त्यांचाही राजकीय फायदा शेळके यांना मिळणार आहे.



Post a Comment

0 Comments