धाराशिव:-नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकी पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीचे सध्या ग्रामीण भागात जोरदार वारे वाहत असून ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी अनेक नवीन आणि अनुभवी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पुर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांच्या कार्याने प्रभावित होऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केलेले धाराशिव तालुक्यातील वाडी बामणीचे माजी उपसरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अमर माने हे शिवसेना व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना सोबत घेवून महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बेंबळी जिल्हा परिषद गट मतदारसंघातून इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार मागणी पुढे येत आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून व त्यांच्या वैयक्तिक जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी या मतदारसंघात मोठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने बेंबळी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
माजी उपसरपंच अमर माने हे नेहमी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सामाजिक कार्यात सक्रिय असतात त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेसाठी स्वखर्चाने अतिवृष्टी काळा अतिवृष्टीबाधित
शेतकऱ्यांसाठी विनामुल्य जेसीबीद्वारे मदत केली असून त्यांनी 10 ऑक्टोबर 2025 ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शेतातील कामगतीसाठी स्वत:ची नवीन जेसीबी विनामूल्य व उदात्त भावनेने शेतकऱ्यांच्या संकटकाळात मदत म्हणून दिली. त्यावेळी त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही झाले होते.
गावातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा...
वाडी बामणी या आपल्या गावातील पाणीपुरवठ्याची योजना सातत्याने पाठपुरावा करुन सुरळीतपणे सुरु केली. पाणीपुरवठ्यासाठी 24 तास चालणारा ट्रान्सफर एक्सप्रेस फिडरवरून बसवला. तसेच शेत रस्ते,संजय गांधी,श्रावण बाळ निराधार योजना,गाव अंतर्गत पेवर ब्लॉक,घरकुल योजना या सारखे विकासकामे प्रभावीपणे राबवली
त्यांच्या या कार्यामुळे बेंबळी जिल्हा परिषद गटातून अमर माने यांच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिक व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते व मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे."सामान्य माणसाच्या सुख-दु:खात धावून जाणारा हक्काचा माणूस"अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, त्यांना उमेदवारी मिळाल्यास या गटात भगवा फडकणारच, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
वाडी बामणीचे माजी उपसरपंच अमर माने यांनी बेंबळी जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीतून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याबाबत शिवसेना पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली असून सध्या बेंबळी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
0 Comments