Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यमगरवाडीच्या 'एकलव्य'चे बालवैज्ञानिक रंगले विज्ञान विश्वात; 15 वर्षाची परंपरा कायम राखत 'विज्ञान परिक्रमा'; सोलापूर सायन्स सेंटर अन् औद्योगिक प्रकल्पांना दिली भेट; विद्यार्थ्यांनी अनुभवली बिस्किट निर्मिती आणि विज्ञानातील किमया

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलातील प्राथमिक विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'विज्ञान परिक्रमा' उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील विज्ञान विश्वाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी या परिक्रमेत इयत्ता सातवीच्या एकूण 44 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विज्ञानातील प्रयोगांनी विद्यार्थी थक्क
या परिक्रमेची सुरुवात सोलापूर विज्ञान केंद्र (सायन्स सेंटर) येथील भेटीने झाली. येथे विद्यार्थ्यांनी विज्ञान दालनातील विविध प्रयोग, थ्री-डी शो, तारामंडल शो तसेच टेलिस्कोपचे बारकाईने निरीक्षण केले. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली.

औद्योगिक प्रक्रिया आणि समाजभान
विज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना उद्योगाची ओळख व्हावी यासाठी चिंचोली एमआयडीसी येथील 'पार्ले प्रॉडक्ट्स' आणि 'सृजन फुड्स'ला भेट देण्यात आली. पार्ले-जी व मोनॅको बिस्किटांची निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, तेथील शिस्त, स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रण याचे धडे विद्यार्थ्यांनी घेतले. यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीला भेट दिली. येथे रक्तसंकलन, साठवणूक आणि वितरणाची प्रक्रिया समजून घेतानाच रक्तदानाचे सामाजिक महत्त्वही विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले.


मार्गदर्शक व आयोजक
या विज्ञान परिक्रमेसाठी संस्थेचे कार्यवाहक विवेक अयाचित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक श्री.भडंगे दयानंद, श्री. अनिल घुगे,श्री.रमेश पवार,सौ.सुजाता गणवीर, श्री. कोंडीबा देवकर व श्री. विठ्ठल म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम राबविणार असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments