Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

समाजवादी पार्टीचा तुळजापुरात बोलबाला; नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची भेट

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यात समाजवादी पार्टीने आपले वर्चस्व निर्माण केले असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आबू आसिम आझमी यांची सदिच्छा भेट घेतली.

तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. यावेळी आबू आझमी यांनी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि आगामी काळात जनहिताची कामे करण्याच्या सूचना दिल्या.

नवनिर्वाचित भावंडांचे कौतुक 
या भेटीदरम्यान प्रामुख्याने तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी यांची कन्या सिमाताई माडजे व मुलगा कृष्णा भैय्या रोचकरी दोन नवनिर्वाचित भावंडांचे विशेष कौतुक करण्यात आले:

सिमाताई माडजे-रोचकरी या तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ गटातून जिल्हा परिषद सदस्या म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत.तर कृष्णा (भैय्या) रोचकरी हे अरळी पंचायत समिती गणातून त्यांनी विजय मिळवला असून, सध्या ते समाजवादी पार्टीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची धुराही सांभाळत आहेत.

यावेळी समाजवादी पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष राहुल जाधव हे देखील उपस्थित होते.

राजकीय वर्तुळात चर्चा
एकाच घरातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर दोन सदस्य निवडून आल्याने रोचकरी परिवाराचे आणि समाजवादी पार्टीचे तुळजापूर तालुक्यातील राजकीय वजन वाढले आहे. "सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असा विश्वास यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केला. या विजयामुळे तुळजापूर तालुक्यात समाजवादी पार्टीची मुळे अधिक घट्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments