Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीच्या शिरपेचात मानाचा तुरा: जयदीप देशमुख 'सीएमए' परीक्षेत उत्तीर्ण! कठोर जिद्द आणि चिकाटीचे फळ; जयदीप देशमुख आता 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट'!

काटी/उमाजी गायकवाड 
जिद्द,चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र जयदीप जयाजी देशमुख याने वाणिज्य क्षेत्रातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'सीएमए' (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. 'दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया'तर्फे डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयदीपने यशाचे शिखर गाठले आहे.
अत्यंत कठीण परीक्षा,पण जयदीप ठरला सरस! 
यावर्षी देशभरातून 19525 विद्यार्थ्यांनी सीएमए फायनलची परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ 999 विद्यार्थीच यशस्वी झाले आहेत. या अत्यल्प निकालातही जयदीपने आपले नाव कोरल्याने त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये इंटरमिजिएट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल पुणे चाप्टरच्या वतीने त्याचा विशेष गौरवही करण्यात आला होता.

शैक्षणिक प्रवास आणि यश: जयदीपचे प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील श्राविका प्रशालेत, तर माध्यमिक शिक्षण हरीभाई देवकरण प्रशालेत झाले. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. 2022 मध्ये त्याने सनदी लेखापाल (सीएमए) प्रवासाला सुरुवात केली. फाउंडेशन, इंटरमिजिएट, इंटर्नशिप आणि आता फायनल असा टप्पा त्याने मोठ्या मेहनतीने पूर्ण केला आहे. सध्या तो पुण्यामध्ये पुढील व्यावसायिक सराव करत आहे.
मैदानावरही गाजवलंय नाव! केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळाच्या मैदानातही जयदीपने आपल्या कौशल्याची छाप पाडली आहे. हरीभाई देवकरण प्रशालेत असताना त्याच्या नेतृत्वाखाली क्रिकेट संघाने आंतरशालेय राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला होता. शाळेला प्रथमच क्रिकेटमध्ये यश मिळवून देण्याचा मान जयदीपच्या संघाने मिळवला होता.
यशाचे गमक: "शैक्षणिक वाटचालीत जिद्द,योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळते," अशी भावना जयदीपने व्यक्त केली आहे. त्याच्या या यशामुळे काटी गावासह तुळजापूर तालुक्याच्या वैभवात भर पडली असून, सर्वच स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments