Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राज्यस्तरीय शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धेत लोटस पब्लिक स्कूलच्या प्रथमेश अमृतरावची कांस्य पदकाची कमाई


तुळजापूर /प्रतिनिधी 
राज्यस्तरीय शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धेत लोटस पब्लिक स्कूल च्या प्रथमेश अमृतरावने कांस्य पदक पटकावल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक धनंजय शहापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     
सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धेत लातूर विभागातून खेळताना प्रथमेश अमृतराव ने १४ वर्षे वयोगटात सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. त्याची नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे पुर्वीच्या प्रशिक्षण सत्रासाठी निवड झाली आहे. प्रथमेश च्या या यशाबद्दल लोटस पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक धनंजय शहापुरे यांनी सत्कार केला आहे. प्रथमेश अमृतराव ला प्रशिक्षक संजय नागरे यांच्या सह करण खंडागळे, प्रियांका हंगरगेकर, यश हुंडेकरी आदिंचे मार्गदर्शन लाभले आहे. 

Post a Comment

0 Comments