Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव च्या भोसले हायस्कूल मध्ये गणित दिन साजरा; आयुष्यात प्रगती करायची असेल तर गणित विषयाशिवाय पर्याय नाही पर्यवेक्षक-तानाजी हाजगुडे

तुळजापूर/प्रदीप अमृतराव
आयुष्यात प्रगती करायची असेल तर गणिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणित विषयाला पर्याय नाही. सर्वच विषयात गणित असल्याने  
 विद्यार्थ्यांनी समजून घेऊन गणिताचा अभ्यास करण्याचे आवाहन पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे यांनी केले आहे. धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रमात पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे बोलत होते. 

प्रारंभी पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजनाने करण्यात आला. यावेळी सूर्यकांत कापसे, प्रसाद माशाळकर आदींची उपस्थिती होती. 


यावेळी शिवकन्या मुंडे, संजीवनी लंगोटे, प्रियांका शिंदे, अंजली चव्हाण, साक्षी गोरे आणि चैतन्य बिराजदार आदी विद्यार्थ्यांनी गणित दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी गणित दिना निमित्त घेण्यात आलेल्या परीक्षा तसेच विविध स्पर्धामधील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
    
प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी विष्णू जांगीड, प्रविण रांगट, शिवाजी गवारे, राज साखरे आदींनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार  गणित शिक्षक ज्योती शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला विध्यार्थी, शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या विद्यार्थ्यांचा केला गौरव
गणित दिना निमित्त घेण्यात आलेल्या परीक्षा तसेच विविध स्पर्धामधील आर्या जाधव, साक्षी देवकते, प्रिया मठपती साक्षी पवार, जान्हवी स्वामी, सिध्दी इंगळे,  अभिजित गुरव, संचिता खोगरे, गणेश जाधव, आकांक्षा एडके, रेहान वाडकर, अभिजीत सुरवसे या गुणवंताना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments