Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खुंटेवाडी येथील रोलर स्केटिंगपटू विनीत जाधव याचे पनवेलमधील नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र संघात निवड

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मुळचा  रहिवासी व ट्रक ड्रायव्हर विशाल मधुकर जाधव यांचा मुलगा चि. विनीत विशाल जाधव याने नुकतेच पनवेलमधील रोलर स्केटिंग नॅशनल चॅम्पियनशिप 2023 ला झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेनंतर त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या खोपोली येथील महाराष्ट्र रोलर ॲथलेटिक्सच्या वतीने स्टेट स्केटिंग चॅम्पियनशिप 2023  स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत त्याने 8 वर्षांखालील मुलांच्या गटातून विनीत जाधवने कौशल्यपूर्ण व चमकदार पध्दतीने स्केटिंग खेळांमध्ये प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.

 

विनीत जाधवचे वडील तुळजापूर  तालुक्यातील खुंटेवाडी येथील विशाल मधुकर जाधव हे ट्रक ड्रायव्हर असून ते सध्या पनवेल येथे वास्तव्यास आहेत. स्केटिंगपटू विनीत जाधव हा पनवेलमधील टी 75 रोलर स्केटिंग क्लबमधील महाराष्ट्र संघाचे कर्णधार प्रसाद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विनीतच्या स्केटिंग स्पर्धेतील यशाबद्दल खुंटेवाडी येथील माजी सरपंच महादेव जाधव, लोकनियुक्त सरपंच सोनल महादेव जाधव, विनीतची आजी तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीमती आशा मधुकर जाधव यांच्यासह ग्रामस्थांमधून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments