Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांची काटी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट; ग्रामपंचायतकडून जंगी स्वागत

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि.23 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी काटी ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली. यावेळी काटी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, प्रदीप  साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील व त्यांच्या  सहकाऱ्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर 

यावेळी सरपंच सुजित हंगरगेकर म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील काटीसारख्या मोठ्या गावात कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे माजी मंत्री बसवराज पाटील, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करीत असल्याचे सांगून कॉंग्रेसची विचारधारा घेऊन महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन काम करीत असल्याचे सांगितले. यापुढेही आपल्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सर्व निवडणुकीत कॉंग्रेस तथा महाविकासचे कार्य निश्चितपणे इतरांपेक्षा सरस राहिल  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरणजी पाटील 

सत्काराला उत्तर देताना प्रदेश  युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी काटी ग्रामपंचायतने केलेल्या सत्काराबद्दल  कृतघ्नता व्यक्त करीत यापुढील काळात तालुका, जिल्ह्यांमध्ये पक्ष बांधणीसाठी संघटन कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी युवकांची फळी निर्माण करुन ज्या पद्धतीने माजी मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील यांनी जो विकास केला त्याच धर्तीवर विकास  कामे पुढील काळात सुध्दा कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही दिली. तसेच येथील युवक व जेष्ठांनी एकत्रितपणे येऊन ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुकही केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जोमाने काम करीत येणाऱ्या काळातील निवडणुकामध्ये पूर्ण ताकतीने उतरत कॉंग्रेस पक्ष जिल्ह्यात  एक नंबर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी  यावेळी दिली.आगामी काळात होणाऱ्या  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी संपुर्ण ताकदीने  कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील,उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील उमरगा नगर पालिका नगरसेवक महेश माशाळकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव राजूभाई मुल्ला, महेश  पाटील,सरपंच सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उपसरपंच जुबेर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी सरपंच शामराव आगलावे,प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, पत्रकार उमाजी गायकवाड, वसंत हेडे, भैरी काळे, भोलेनाथ बनसोडे, रामहरी  लोंढे,अमोल गावडे, शिवलिंग घाणे, चंद्रकांत काटे,अजम शेख, निहाल  शेख आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments