Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील कै. गणु कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित आयोजित किर्तन महोत्सवाची धार्मिक वातावरणात सांगता; आईवडिलांची सेवा व स्मरण हिच परमेश्वराची सेवा--हभप उमेश महाराज दशरथे (आळंदी)


काटी/उमाजी  गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथे कै.गणु एकनाथ कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील  जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हभप मनोहर गणु कदम-पाटील व मृदगाचार्य हभप कृष्णात महाराज कदम -पाटील यांच्या वतीने दि. 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत भव्य तीन दिवसीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

तीन दिवस चाललेल्या या किर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, गायनाचार्य व मृदगाचार्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे काटीसह परिसरातील भाविकांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात चाललेल्या या किर्तन महोत्सवात हजेरी लावून या किर्तन सेवेचा लाभ घेतला.

या किर्तन  महोत्सवात शुक्रवार दि 22 रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत हभप डाॅ.जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा पार पडली. शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत श्रीगुरु गोवत्स संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन तर सायंकाळी 8 ते 10 या वेळेत भाषाप्रभु अनिल महाराज पाटील यांची कीर्तन सेवा संपन्न  झाली. रविवार दि 24 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत वारकरी भूषण उमेश महाराज दशरथे यांच्या  काल्याच्या किर्तनानंतर त्यांच्याच हस्ते दुपारी  12 वाजता दहिहंडी फोडून महाप्रसादाचे  वाटप करण्यात आले.

        दहिहंडी फोडताना हभप उमेश महाराज 

हभप श्रीगुरु वारकऱ्यांचे भुषण उमेश महाराज दशरथे (आळंदी) यांनी सुंदर अशा काल्याच्या किर्तनात उपस्थित भाविकांना संबोधित करताना कै. गणु एकनाथ कदम -पाटील यांचे चिरंजीव हभप मनोहर कदम-पाटील  व नातू हभप मृदगाचार्य कृष्णात महाराज यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार, गायनाचार्य व मृदगाचार्य बोलावणं हि सोपी गोष्ट नसून त्यांच्या सांप्रदायिक परिवाराच्या संबंधांमुळे हा संतांचा मेळा भरला असल्याचे सांगितले. 

    हभप श्रीगुरु गोवत्स संजय महाराज पाचपोर 

काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून ह. भ. प. उमेश महाराज दशरथे यांनी बाल कृष्णाच्या विविध लीला उपस्थित भक्तगणांसमोर अत्यंत रसाळ, ओघवत्या वाणीतून व विनोदी शैलीत मांडली.यशोदा माता तीच जीला दुसर्‍याला मोठेपणा देता येतो. आणि म्हणून मोठ्या माणसाचं लक्षण असतं ते श्रेय दुसर्‍याला देतात. संसारात कुठलीही गोष्ट सोशल्याशिवाय मिळत नाही. तर देव शरीराचे सौंदर्य पाहत नाही मनाचं सौंदर्य पाहतो. आणि म्हणूनच नामजपाने मनाचे सौंदर्य वाढवा असा उपदेश महाराजांनी केला.

आयोजक हभप मनोहर कदम व कृष्णात कदम पाटील यांनी आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित हा भव्य  किर्तन  महोत्सव  भरविल्याबद्दल व या किर्तन महोत्सवातील उपस्थित भक्तगणांचे कौतुक करीत आईवडिलांची सेवा व स्मरण हिच परमेश्वराची सेवा असल्याचे सांगून आईवडिलांची मनोभावे सेवा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी हभप सद्गुरू प्रभाकर दादा बोधले (पंढरपूर), मृदंगामहामेरु रामभाऊ महाराज काजळे (परभणी),हभप शांतीब्रम्ह तुकारामभाऊ (पुणे), हभप संदीपान महाराज (वाई), हभप विठ्ठल वासकर( पंढरपूर), ज्ञानेश्वर माऊली दिंडेगावकर, हभप निळकंठ महाराज दिंडेगावकर, हभप विष्णुदास नामदेव बाबा, पांडुरंग महाराज रेडी (तुळजापूर), रामकृष्ण शास्त्री, हभप महेश महाराज माकणीकर, हभप बापुसाहेब महाराज ढगे (इंदापूर), हभप कुमार महाराज केमधारणे, सुनिल  महाजन ढगे (काटी)हभप दत्ता महाराज यादव, हभप ब्रम्हदेव माळी, हभप मृदगाचार्य अरुण महाराज कदम (आळंदी), तुकाराम महाराज पांचाळ (आळंदी), प्रभाकर वाघचौरे, रघुनंदन महाराज, सुहास मोठे, डॉ. सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तर काटीसह परिसरातील स्थानिक पदाधिकारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महोत्सवाचे आयोजन समितीतील हभप मनोहर  कदम व कृष्णात महाराज कदम पाटील, राम कदम पाटील यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहभागी असणार्‍या सर्वच घटकातील ज्येष्ठ, श्रेष्ठ मान्यवर कार्यकर्ते, भक्तगण यांचे आभार व्यक्त करीत नामजप व नामसंकीर्तन महोत्सवाचा यज्ञ यापुढेही असाच तेवत राहील असे आश्वासन दिले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments