Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुंभारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.खंडु कुंभार यांची सर्वानुमते निवड

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर  तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.खंडु कुंभार  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सौ. लक्ष्मी उत्तम गाडेकर यांची निवड झाली.

शनिवार दि.23 रोजी केंद्रप्रमुख संजय वाले यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर 2023-ते डिसेंबर 2025 या शैक्षणिक वर्षासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शालेय व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले.

यावेळी डिसेंबर 2023 ते डिसेंबर  2025 या दोन वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी खंडु कुंभार यांची तर उपाध्यक्षपदी सौ. लक्ष्मी उत्तम गाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी केंद्र प्रमुख संजय वाले व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक  आदी उपस्थित पालकांनी नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडु कुंभार व उपाध्यक्ष लक्ष्मी गाडेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले.

नूतन अध्यक्ष खंडु कुंभार यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करण्याचे आश्वासन  दिले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments