तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
सोनी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय अशा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून आपल्या मोकळ्या आणि अनोख्या शैलीने घराघरात पोहोचलेली लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले.
तुळजापूर येथील मुख्य मंदिरात उपस्थित राहून प्राजक्ता माळी हिने श्री तुळजाभवानी देवीची घटकाभर आरती केली व पारंपरिक पद्धतीने ओटी भरली. यावेळी तिच्यासोबत तिचे कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या कुलपरंपरेनुसार धार्मिक विधी, कुलधर्म आणि कुलाचार पार पाडत तिने आई तुळजाभवानीच्या चरणी माथा टेकवला.
आई तुळजाभवानीच्या चरणी प्राजक्ता माळी! 🌸✨अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सहकुटुंब घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला यथोचित सत्कार.
📰 बातमी पाहण्यासाठी भेट द्या: Only न्युज धाराशिव
🏛️ मंदिर संस्थानाकडून यथोचित सन्मान
भावपूर्ण दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. मंदिर प्रशासनाकडून तिला श्री तुळजाभवानी देवीची स्मृती प्रतिमा (फ्रेम) आणि प्रसादाचे महावस्त्र भेट देऊन गौरवण्यात आले.
उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, नागेश शितोळे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments