Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

बिग ब्रेकिंग:धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी अनंत सूर्यवंशी तर तुळजापूर तालुकाध्यक्षपदी राम भोसले यांची निवड

धाराशिव | Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
जिल्हा मुख्याध्यापक संघाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अनंत सूर्यवंशी सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा कार्यकारिणीवर संचालक म्हणून एस. डी. वडणे सर आणि तुळजापूर तालुकाध्यक्षपदी राम भोसले सर यांची निवड निश्चित करण्यात आली.

बुधवार, दिनांक ८ जुलै रोजी तांबरी विभाग येथील 'मुख्याध्यापक भवन' येथे या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही वातावरणात ही बैठक संपन्न झाली.

अशी आहे नवीन कार्यकारिणी:
जिल्हाध्यक्ष: अनंत सूर्यवंशी सर

जिल्हा संचालक: एस. डी. वडणे सर (मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय, तामलवाडी)

तुळजापूर तालुकाध्यक्ष: राम भोसले सर (मुख्याध्यापक, संजीवनी माध्यमिक विद्यालय, काक्रंबा)

ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत निवड
या निवडीच्या वेळी धाराशिव मुख्याध्यापक संघाचे मानद अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक एम. डी. देशमुख सर, माजी अध्यक्ष डी. डी. शेरे सर, माजी अध्यक्ष टेकाळे सर, दिलीप पाटील सर, मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे सर, संजय भोईटे सर आणि मुख्याध्यापक मोरे सर प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित सर्वच मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत करत, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न व मुख्याध्यापकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही नवी कार्यकारिणी सक्षमपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

निवड जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यातून अनंत सूर्यवंशी सर, एस. डी. वडणे सर आणि राम भोसले सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments