Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

एकलव्य विद्या संकूलात जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ -यमगरवाडी येथील  एकलव्य विद्या संकूलात इतर मागास बहुजन कल्याण धाराशिव यांचे वतीने आयोजित दोन  दिवसीय जिल्हास्तरीय आश्रम शाळेच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन इतर मागास बहुजन कल्याण लातूर विभागाचे संचालक दिलीप राठोड, धाराशिवचे सहाय्यक संचालक बाबासाहेब अरवत,भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित यांच्या हस्ते गुरुवार दि.18 रोजी सकाळी करण्यात आले.

या क्रिडा स्पर्धेत दोन दिवस मुले व मुलींच्या स्वतंत्र स्पर्धा होणार आहेत. या मध्ये प्रामुख्याने कबड्डी,खो खो,कबड्डी,धावणे आणि लांब उडी या स्पर्धा असणार आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 37 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. 

या स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडाव्यात असे आवाहन दिलीप राठोड यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बळीराम जगताप यांनी केले.

यावेळी मुख्याध्यापक बळीराम जगताप,संतोष चव्हाण, अण्णासाहेब चव्हाण,दयानंद राठोड,अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे,नाईक सर, बचाटे सर,देवकर,मोहन राठोड तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments