काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी-सावरगाव रोडवरील काकासाहेब लेंगरे यांच्या शेतातील श्री संत सद्गुरू बाळु मामा मंदीर परिसरात श्री संत सदगुरू बाळूमामा यांची मुक्या प्राण्यांची पालखी व मेंढ्यांचा कळप 11 जानेवारी रोजी दाखल झाला होता. या कळपाचे दिंडी चालक लिंगाप्पा पूजारी व हल्लप्पा कारभारी होते. त्यांच्या दर्शनसाठी काटीसह पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी केली होती.
या मेंढ्यांना व पालखीला आपल्या घराजवळ आसरा दिल्यास आपल्या शेतात पीक उत्तमरीत्या येते व घरातील आर्थिक स्थिती सुधारून दुष्ट शक्तींचा नाश होतो, अशी प्रत्येक भाविकांची श्रद्धा आहे. येथे सदगुरू बाळूमामा यांच्या मेंढ्यांचा कळप क्रमांक 14 दाखल झाला होता. सदगुरू बाळूमामा यांच्या मेंढ्यांचे एकूण 18 कळप असून, त्यात 30 हजारांहून अधिक मेंढ्या आहेत. या कळपांपैकी 11 महाराष्ट्रात विविध दिंड्यांच्या माध्यमातून फिरत असून, प्रत्येक कळपात अंदाजे 3 हजार मेंढ्या आहेत. उर्वरित 4 कळप कर्नाटकमधील विविध भागात फिरत आहेत.
दि. 11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान या ठिकाणी ते वास्तव्यास होते. गुरुवार (दि. 18) रोजी सकाळी गावातून "बाळु मामाच्या नावानं चांगभलं"च्या जयघोषात संत सदगुरू बाळूमामा यांची पालखी मिरवणूक निघाली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मेढ्यांचा कळप सावरगावच्या दिशेने गेला.
सदगुरू बाळूमामा यांच्यावरील श्रद्धेपोटी गावोगावी या मुक्या प्राण्यांचे व पालखीचे स्वागत केले जाते. या दरम्यान काटी गावांमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले करण्यात आले होते.अगदी स्वागतापासून ते बिदागीपर्यंत सेवा केली करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी बाळु मामा मंदीराचे पुजारी काकासाहेब लेंगरे यांच्यासह भाविकांनी परिश्रम घेतले.
आमची श्रद्धा असल्याने आम्ही या कळपाला आसरा दिला आहे व जमेल तशी सेवा करीत असून, भाविकांसाठी गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच येथे बाळु मामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून येथील भाविकांच्या श्रध्देने येथे काटी-सावरगाव रोडवर बाळु मामाच्या मंदीराचे बांधकाम काम सुरु असून लवकरच भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे.
--काकासाहेब लेंगरे पुजारी बाळु मामा मंदिर, काटी ता.तुळजापूर
0 Comments