Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

येणेगूर येथील ग्रामपंचायतीवर वार्ड क्र.1 मधील महिलांचे घंटानाद व घागर मोर्चा आंदोलन

येणेगूर/योगेश पांचाळ
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे पाणीची शून्य योजना असल्याने येणेगूरमध्ये 15दिवसापासून पाणी नाही आल्यामुळे वार्ड क्र.1 मधील महिला आक्रमक झाल्याने येणेगूर ग्रामपंचायत समोर महिलांनी थाळी वाजवून व घागर मोर्चा घेऊन  ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच विजयानंद सोनकटाळे,ग्राम.पं.सदस्य प्रवीण कागे,सरपंच पती विश्वनाथ गुंजोटे, विश्वनाथ स्वामी,ग्राम.पं.सदस्य राहुल बनसोडे यांनी या ग्रामस्थांना आजच्या दिवशी पाणी सोडण्यात येईल व बोरवेलचा दुरुस्ती करण्यात येईल व ठिय्या मारून बसलेल्या महिलांना असे आश्वासन दिले.यावेळी मोहम्मद हुसेन येळीकर, दत्ता माने, ज्ञानेश्वर मुळे, नारायण सगर, राजेंद्र हिप्परगे, प्रकाश येडगे, मीनाक्षी माने, लक्ष्मी कोळी, अकीला शेंख, फातिमा शेंख,अनिता मायनाळे, शबाना पटेल, ममुला शेख, नंदुबाई सोनकटाळे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments