Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रा. डॉ. महेश मोटे यांचा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मान

        
 उमरगा/प्रतिनिधी 
उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्राचे समन्वयक प्रोफेसर डॉ. महेश मोटे यांचा बेलाटी, ता. उत्तर सोलापूर येथे आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलनात रविवारी (ता. २५) रोजी सुप्रसिद्ध इतिहास संशोधक तथा अध्यक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे, संमेलन अध्यक्ष तथा माजी आमदार अँड. रामहरी रुपनवर, संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. आर. एस. चोपडे यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार प्रा. डॉ. महेश मोटे व सौ. मीरा मोटे यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, फेटा बांधून व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.

 यावेळी सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवार पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, लातूर जिल्हा बँकेचे संचालक तथा उपाध्यक्ष संभाजीराव सुळ, लातूरचे उपायुक्त रामदास कोकरे, सोलापूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, करमाळा मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, पत्रकार उज्वलकुमार माने, संयोजक सिद्धारूढ बेडगनूर, देवेंद्र मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या संशोधन व साहित्य क्षेत्रातील केलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments