काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दि. 24 रोजी विद्यार्थ्यांना शाळेत कृतीशील शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला
बाल कारागिरांचा खाऊ बाजार अर्थात आनंद मेळावा उत्साहात पार पडला.
या बाल आनंद मेळाव्याचे उद्घघाटन विविध मान्यवर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ.अश्विनी सुरडे यांनी केले.
या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे एकूण 40 दुकाने मांडण्यात आली होती. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पाववडा, भजी, संकल्प मिसळपाव, गुलाबजामुन, बटाटावडा, इडली सांबर, पाणीपुरी,ओली भेळ, ऊसाचा रस, लिंबू सरबत, ढोकळा, वडा,समोसे, फरसाण, मॅगी,चॉकलेट,बिस्कीट पुडे याबरोबर मुलींनी विविध भाजीपाल्याची व फळांची दुकाने मांडली होती. उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अश्विनी सुरडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी प्रत्यक्ष सर्व स्टॉलला भेट दिल्यानतंर विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या कलेने भारावल्याच्या मनोगत व्यक्त करीत त्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यवसायिक अनुभव अनुभवून व्यवसायातील आर्थिक उलाढालीचा अनुभव घेतला. या बाल आनंद मेळाव्यात 40 हजारांची उलाढाल झाली असून विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून एक हजार ते दीड हजारांपर्यंत नफा झाला आहे.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनी सुरडे, मुख्याध्यापक शेखू जेटीथोर, सहशिक्षक बलभीम भोयटे, अशोक जेटीथोर, सुखदेव भालेराव, सुषमा देशमुख, गीताश्री पाटील, द्रोपदी लांडगे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments