Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरातील पहिले मोफत उपचार करणारे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल

तुळजापूर / ज्ञानेश्वर गवळी
महंत तुकोजी महाराज यांच्या शुभहस्ते वरदायिनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुळजापूर येथे आजपासून रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सर्व रोगावर सर्व प्रकारच्या रुग्णांना मोफत उपचार करण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेऊन त्याची गोष्ट संचालक विशाल रोचकरी व अधिष्ठाता डॉक्टर अजिंक्य वडगणे यांनी केली आहे. विजय कंदले, नरेश अमृतराव, दत्तात्रय क्षीरसागर, संजय शिरसागर, राजू शिंदे
पत्रकार डॉक्टर सतीश महामुनी ,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,श्रीकांत कदम, गुरुनाथ बडुरे, गोविंद खुरुद ,सचिन ताकमोगे संजय खुरुद ,अनिल आगलावे, नितीन बागल, सिद्दिक पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर महंत तुकोजी बुवा महाराज यांच्या शुभहस्ते वरदायिनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने सर्व प्रकारच्या रुग्णांना मोफत उपचार करण्याची योजना प्रारंभ करण्यात आली याची घोषणा अधिकृतपणे शहरातील सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे वाढता रुग्ण सेवेचा खर्च लक्षात घेता हॉस्पिटल संचालक मंडळांनी घेतलेला हा निर्णय क्रांतिकारक आहे यामुळे शेकडो गरजू गरीब कुटुंबातील रुग्णांना अत्याधुनिक सेवा सुविधा तुळजापूर येथे उपलब्ध होणार आहेत या उपक्रमामुळे आपण आगामी काळात आरोग्य क्षेत्रामध्ये चांगले काम करू गरज पडली तर यासाठी आपण राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर काही दानशूर व्यक्तीकडून घेतलेला दान मधून हा खर्च करण्यात येईल असे याप्रसंगी संचालक विशाल रोचकरी यांनी घोषित केले.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर 
9923005236

Post a Comment

0 Comments