Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोकसभा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तामलवाडीत पोलीसांचे पथसंचलन

काटी/उमाजी  गायकवाड
मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद गुरुवार  दि.11 रोजी संपन्न होणार असल्याने व आगामी  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे गावातील प्रमुख मार्गावरून तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात पोलीसांचे पथसंचलन  करण्यात आले.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत व गावात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सपोनि  शैलेश पवार यांच्यासह तामलवाडी पोलीसांनी विशेष नियोजन केले असून बुधवारी गावातील  प्रमुख मार्गावरून मुस्लिम बहुल भागात पोलिसांनी पथ संचलन केले. या पथसंचलनात होमगार्ड पथकासह  तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments