Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

यमगरवाडी येथे माजी विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी -मंगरुळ येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीने एकलव्य विद्या संकुलात या शाळेत  शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांसाठी 11 व 12 एप्रिल या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रिकेट स्पर्धेसाठी 260 माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून या सर्व माजी विद्यार्थ्यांची सोयी संस्थेमार्फत केली जाणार आहेत. या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर, धाराशिव,लातूर, बीड, परभणी ,मुंबई, ठाणे, पुणे ,कोल्हापूर,संभाजीनगर व कर्नाटक या भागातून नोकरी व्यवसाय करणारे माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. 

या भव्य  क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन  भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर,कार्यवाह विवेक अयाचित व संस्थेचे पदाधिकारी यांच्या  उपस्थितीत माजी विद्यार्थी प्रमुख राजाभाऊ गिजरे यांचे हस्ते होणार आहे. 

या क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे,विभाग प्रमुख अनिल घुगे, अण्णासाहेब मगर, यशवंत निंबाळकर,सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments